Maharashtra Rain: लेकरांना घरीच राहू द्या! पुण्यात उद्या शाळांना सुट्टी, आणखी कोणत्या जिल्ह्यात सुट्टी जाहीर?

0
school rain

राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुण्यात ७ जुलै रोजीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यासह नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.

अतिवृष्टीचा इशारा आणि संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सर्व शाळांना ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नवी मुंबईमध्येही शाळांना सुट्टी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे मंगळवार  7 जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

नाशिकमध्येही शाळांना सुट्टी

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हार, मोखाडा, पेठ आणि दिंडोरी या भागात ढगफुटी होण्याचा अंदाज आहे. आज सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुसळधार पाऊस तर मध्यरात्री ढगफुटी पावसाचा  हवामान खात्याचा अंदाज आहे.  त्रंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी मंदिर बंद तर नाशिक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

ठाण्यातही असणार सुट्टी

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत पाहणी केली. पुढील तीन दिवस ठाण्यासाठी महत्त्वाचे असून उद्या देखील शाळा कॅालेज महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात

रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान,  रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मंगळवार ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

पालघरमध्ये शाळांना सुट्टी

पालघरमध्ये उद्या पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. उद्या जिल्ह्यात अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याामुळे शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *