गौतम बँकेचा सभासदांना दिवाळीआधी लाभांश; ३८.७९ लाख रुपये खात्यात जमा

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

दिवाळीच्या सणापूर्वी गौतम सहकारी बँकेने सभासदांना लाभांशाची भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेने मिळविलेल्या नफ्यातून ३८ लाख ७९ हजार ३६३ रुपयांचा लाभांश मंगळवारी (३ नोव्हेंबर) सभासदांच्या बँक खात्यांत थेट जमा करण्यात आला. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

बँकेचे अध्यक्ष संजय आगवण, उपाध्यक्ष विजय रक्ताटे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड आणि कर्मचारी यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे आमदार काळे यांनी कौतुक केले. दिवाळीपूर्वीच लाभांशाची रक्कम थेट खात्यात जमा झाल्याने सभासदांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या