कर्मवीर कृषी महोत्सवाचे आयोजन; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन राजेंद्र सालकर.: कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १४व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून शनिवार (दि. २१) ते सोमवार (दि. २३) या कालावधीत गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर भव्य ‘कर्मवीर कृषी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पना तसेच शेतीपूरक व्यवसायांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सामाजिक, सहकार आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सहकाराच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. त्याच विचारांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळणार

त्यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने मतदारसंघातील सहा गटांतील भजनी मंडळांना वीणा, पखवाज, हार्मोनियम, दहा टाळ आणि सतरंजी या भजन साहित्याचे लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात आले.

यामध्ये शनेश्वर भजनी मंडळ, वडगाव; जय हनुमान भजनी मंडळ, मढी बु.; गोपाजीबाबा भजनी मंडळ, बहादराबाद; दत्त प्रसाद भजनी मंडळ, धोत्रे; रेणुकामाता भजनी मंडळ, उक्कडगाव आणि हनुमान प्रसादिक भजनी मंडळ, लक्ष्मीनगर कोपरगाव यांचा समावेश आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या