कोपरगावात वाढत्या चोऱ्यांवर आमदार आशुतोष काळे आक्रमक; ‘चोरांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण करा!’

कोपरगावासह तालुक्यातील चोरट्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना स्पष्ट निर्देश

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन

कोपरगाव शहर आणि तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाहेरून आलेला पाहुणा असो किंवा स्थानिक नागरिक, प्रत्येकाला कोपरगाव शहर आणि तालुक्यात सुरक्षिततेची खात्री वाटली पाहिजे. चोरांच्या मनात पोलिसांचा धाक आणि नागरिकांच्या मनात कायदा-सुव्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी दुपारी दोन वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात शहर व तालुका पोलिसांची आढावा बैठक झाली. शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वाढत्या चोऱ्या, पोलीस गस्त, बसस्थानकावरील सुरक्षा आणि ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांवर चर्चा करण्यात आली.

गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर हवी

बंद फ्लॅट, शेतातील मोटारी आणि सौरपॅनेल चोरट्यांच्या निशाण्यावर

‘घुंगट की आड में’ चोरी; सीसीटीव्हीसमोर नवे आव्हान

बसस्थानकावरील चोरीच्या घटनांबाबत बोलताना शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी अनेक चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगितले. काही महिला चोर डोक्यावर पदर घेऊन चोरी करत असल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांनी चुकीचे समर्थन करू नये!

चौकट | सुरक्षित कोपरगावसाठी महत्त्वाच्या सूचना

शहर व ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढविणे,.बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी प्रभावी बंदोबस्त ठेवणे.,सीसीटीव्ही यंत्रणेचा सक्षमपणे वापर करणे.,ग्रामसुरक्षा दल, होमगार्ड आणि पोलीस यांच्यात समन्वय वाढविणे.,गुन्हे घडल्यानंतर तपासाबरोबरच गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे.

या बैठकीस कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप रोहमारे, नगरसेवक मेहमूद सय्यद, मंदार पहाडे, सुनील गंगुले, विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, प्रशांत वाबळे, फकीर मामू कुरेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनवणे यांनी आभार मानले.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या