कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी कृतीतून जपण्याची संधी असल्याचा संदेश संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील निर्धन, निराधार आणि गरजू नागरिकांना उबदार ब्लँकेटचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे अनेक गरजूंना थंडीपासून संरक्षण मिळण्यास मदत झाली. वाढदिवसाचा आनंद वंचित घटकांसोबत वाटून घेतल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवस हा केवळ औपचारिक शुभेच्छांचा दिवस नसून गरजूंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची संधी असल्याचे मत व्यक्त केले. गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे हीच समाजसेवेची खरी ओळख असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सौ. रेणुका कोल्हे या महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम आणि गरजूंना मदत अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लाभार्थ्यांनी आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रदीप नवले, विजय गायकवाड, दीपक जपे, सचिन त्रिभुवन, रोशन शेजवळ, संतोष शेजवळ, विजुभाऊ आढाव, नाना भुजबळ, कैलास सोमासे, चेतन आगळे, श्याम शेवते, राहुल खरात, भीमराव गंगावणे, बाळू पठाडे, किरण ससाने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील गरजू, निराधार आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्य राखण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
