शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपचा थेट ‘संवाद’; टाकळीत सुनील राणे–विवेक कोल्हेंनी जाणून घेतल्या अडचणी

कोपरगाव | वृत्तवेध :

पीकविमा, पाटपाणी, हमीभाव, सिंचन आणि वाढता उत्पादन खर्च अशा प्रश्नांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने कोपरगाव तालुक्यात शेतकरी संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. कोपरगाव मंडलातील टाकळी येथे भाजपचे प्रदेश महामंत्री तथा आमदार सुनील राणे यांनी आमदार विवेक कोल्हे यांच्या समवेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

या संवादात पीक कर्ज, पीकविमा, हमीभाव, पाटपाणी, सिंचन, पाणी व्यवस्थापन, शेतीमालाची बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळतो की नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न आणि सूचना मांडल्या. प्रदेश महामंत्री थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

‘प्रश्न ऐकणे पुरेसे नाही; मुळापर्यंत जाणे गरजेचे’

पाटपाण्याचे प्रभावी नियोजन करा : कोल्हे

पीकविमा योजनेत बदलाची गरज

शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पीकविम्याचा हप्ता भरतो. मात्र प्रत्यक्ष नुकसान झाल्यानंतर जाचक अटी आणि किचकट प्रक्रियेमुळे भरपाई मिळण्यात अडथळे येतात, असा मुद्दा आ. कोल्हे यांनी मांडला. त्यामुळे पीकविमा योजना अधिक पारदर्शक, सुलभ आणि शेतकरीपूरक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समृद्धी महामार्ग, विमानतळ, रेल्वेचा शेतीला फायदा घ्या!

कोपरगावला समृद्धी महामार्ग, विमानतळ आणि रेल्वे मालवाहतुकीच्या सुविधा जवळ उपलब्ध आहेत. या भौगोलिक सुविधांचा शेतीच्या विकासासाठी प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे आ. कोल्हे यांनी सांगितले. तालुक्यात आधुनिक शीतगृहे, स्टोरेज आणि साठवणूक केंद्रे उभारल्यास शेतकऱ्यांना शेतीमाल साठवून योग्य वेळी योग्य दरात विकता येईल. त्यामुळे नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी, सूचना

यावेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न आणि सूचना मांडल्या. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अशोक पवार, सरपंच संदीप देवकर, शरदनाना थोरात, माजी सभापती सुनील देवकर, मंडलाध्यक्ष सुनील कदम, दीपक चौधरी, संचालक निलेश देवकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या