मोबाईलच्या अतिवापरापासून सावधान! महिलांनी कमजोर नव्हे, सक्षम बनावे-संगीता मालकर

कोपरगाव | वृत्तवेध :

सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा काळ असला तरी मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी नुकसानकारक ठरतो. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापरही योग्य आणि जबाबदारीने करावा. उच्च शिक्षणासोबत कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संगीता मालकर यांनी केले.


स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण कक्षाच्या वतीने ‘महिला सुरक्षितता’ विषयावर विशेष व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संगीता मालकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.


राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई यांसारख्या कर्तृत्ववान महिलांना आदर्श मानून विद्यार्थिनींनी वाटचाल करावी. महिला सक्षमीकरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि शिक्षण या तीन बाबींना महत्त्व द्यावे, असेही डॉ. ठाणगे यांनी स्पष्ट केले.


विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ. नीता शिंदे यांनी केले. प्रा. ऋतुजा कदम यांनी सूत्रसंचालन केले, तर कक्षाच्या सदस्या डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी आभार मानले. विज्ञान, वाणिज्य तसेच बी.कॉम. सी.ए. शाखेतील बहुसंख्य विद्यार्थिनी या व्याख्यानास उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. हर्षदा पेडणेकर, प्रा. सोनाली आव्हाड आणि प्रा. जयश्री खंडीझोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
ठळक मुद्दे :
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा
AI चा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन
महिलांना कमजोर समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज
शिक्षणासोबत कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या