‘आयत्या पिठावर रेघोट्या’; विकासकामांच्या श्रेयावरून राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

‘आधी निधी आणा, मग भूमिपूजन करा’; प्रभाग ११, १२, १३ आणि दत्तनगरच्या रस्त्यांवरून कोपरगावातील राजकारण तापले

वृत्त वेध कोपरगाव :

शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ आणि दत्तनगर भागातील रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी मंजूर करून आणला असताना, सत्ताधाऱ्यांकडून या विकासकामांचे अनधिकृत उद्घाटन करून आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील गंगुले यांनी केला. ‘आधी स्वतः निधी आणा आणि मग भूमिपूजन करा,’ असा थेट टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

कोपरगाव नगरपरिषदेत विकासकामांच्या श्रेयावरून सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील विकासकामे, रस्ते, मोकाट जनावरे आणि नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.

‘निधी आमदारांचा, श्रेय सत्ताधाऱ्यांचे?’

रस्त्यांचे उद्घाटन अनधिकृत? राष्ट्रवादीचा दावा

मोकाट जनावरे, गटारींचे ढापे आणि मुरमाचा मुद्दा ऐरणीवर

‘ऑक्टोबर २०२५ ची वर्क ऑर्डर; मग निधी आणला कसा?’

दत्तनगर भागातील रस्त्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी कोल्हे गटाचा नगराध्यक्ष नव्हता आणि नगरपरिषदेत त्यांची सत्ताही नव्हती. त्यामुळे ‘मग या कामाचा निधी सत्ताधाऱ्यांनी आणला कसा?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी उपस्थित केला.

‘नगरपरिषद तुमची खाजगी मालमत्ता नाही’

पत्रकार परिषदेस उपस्थिती

पत्रकार परिषदेस मंदार पहाडे, विरेन बोरावके, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र वाकचौरे, सचिन गवारे आणि फाकीर कुरेशी उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या