अतिक्रमण कारवाईवर ठाकरे गटाचा सवाल; ‘पुनर्वसनाशिवाय हटाव अन्यायकारक’

सणासुदीच्या काळातील कारवाईवर पदाधिकाऱ्यांचा संताप; विस्थापित व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची मागणी

कोपरगाव‌ वृतवेध :

शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सणासुदीच्या काळात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचा रोजगार हिरावला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. अतिक्रमण हटविण्यास विरोध नसून, कारवाईपूर्वी विस्थापितांच्या पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या संदर्भात ठाकरे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, शहरप्रमुख गगन हाडा आणि मनोज कपोते यांनी पालिका प्रशासनाच्या कारवाईवर भूमिका मांडली.

‘कारवाई होते; पुनर्वसनाचे काय?’

शंभर दिवसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह

नगरपालिकेने शंभर दिवसांत विविध विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठोस विकासकामांऐवजी नागरिकांचे लक्ष इतर प्रश्नांकडे वळविण्यासाठी अतिक्रमण कारवाईचा वापर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

शहरातील नागरी प्रश्न सोडविण्यासोबतच अतिक्रमणामुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

दोन लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या