यंदा दहीहंडीचा थर कमी; माणुसकीची उंची मोठी; हंडी फुटणार, पण खर्चाचा पैसा मदतीला जाणार!;

कोपरगावच्या मानाच्या दहीहंडीला सामाजिक बांधिलकीची संजीवनी युवा प्रतिष्ठानची नवी दिशा;

कोपरगाव वृत्त वेध:
दहीहंडी म्हटली की डीजेचा दणदणाट, गोविंदांचा जल्लोष, मोठे आयोजन आणि बक्षिसांची आतषबाजी… मात्र यंदा कोपरगावात उत्सवाच्या या नेहमीच्या चौकटीला छेद देणारा निर्णय घेण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी भव्य स्वरूपात साजरी करण्याऐवजी साध्या व प्रातिनिधिक पद्धतीने साजरी करून आयोजनावर होणारा खर्च आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी वळविण्याचा निर्णय संजीवनी युवा प्रतिष्ठानने घेतला आहे.

‘उत्सव किती मोठा केला, यापेक्षा संकटात सापडलेल्या माणसासाठी आपण किती मोठे उभे राहिलो, हे महत्त्वाचे’, या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे यंदाच्या दहीहंडीला सामाजिक संवेदनशीलतेची नवी किनार लाभली आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

गोविंदांच्या जल्लोषाऐवजी मदतीचा हात

ही पहिलीच वेळ नाही…

मानाची दहीहंडी; मात्र यंदा वेगळ्या अर्थाने

५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते मानाची दहीहंडी फोडण्यात येणार आहे.

उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी केले आहे.

यंदाच्या दहीहंडीची खासियत त्यामुळे फक्त हंडी किती उंच बांधली जाते किंवा किती थर रचले जातात, यात राहणार नाही. तर त्या थरांच्या पलीकडे जाऊन संकटग्रस्तांच्या मदतीसाठी किती हात पुढे येतात, याकडेही लक्ष राहणार आहे.

वृत्तवेधचा सवाल : उत्सवाची खरी उंची कशात?

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या