नाशिक–शिर्डी रेल्वेमार्गाचा तिढा सुटणार? आमदार आशुतोष काळेंचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार

भूसंपादनाच्या प्रश्नांवर प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक; बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची ग्वाही

कोपरगाव | वृत्तवेध
नाशिक–शिर्डी प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आता आमदार आशुतोष काळे यांनी थेट हात घातला आहे. भूसंपादनातील विविध अडचणी, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांवर आमदार काळे यांच्या पुढाकारातून संबंधित प्रकल्प अधिकारी व महसूल यंत्रणेची बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी रामनारायणजी सैनी यांनी दिले.


आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता बैठकीतील आश्वासन प्रत्यक्ष निर्णयात आणि निर्णय प्रत्यक्ष कार्यवाहीत कधी उतरतो, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.


बैठकीस भूमी अभिलेख विभागाचे शेखर कोकरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रविण शिंदे यांच्यासह शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, सचिन रोहमारे, बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, सोपानराव गुडघे, रामनाथ घारे, गोपीनाथ राहणे, वाल्मिक नवले, नंदकिशोर औताडे, अण्णासाहेब पाचोरे, देवराम पाचोरे, एकनाथराव पाचोरे, पोपट पाचोरे, गहिनाजी जाधव, ज्ञानदेव पाचोरे, आप्पासाहेब पाचोरे, प्रमोद पाचोरे, साईनाथ तळोदे, ऋषिकेश औताडे, संजय तळोदे, साहेबराव औताडे, योगेश वाके, सचिन वाके, यतीन औताडे, पराजी राहणे, अशोक डांगे, अशोक पाडेकर, किरण औताडे, संभाजी पाचोरे, दशरथ थोरात, तुकाराम थोरात, संदीप पाचोरे, अण्णासाहेब थोरात आदी उपस्थित होते. रेल्वे, भूमी अभिलेख व महसूल विभागाचे अधिकारी तसेच बाधित शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या