पूर्व भागाच्या विकासाला ‘गती’; आता पुढचे लक्ष्य,पूर्व भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे-आ. आशुतोष काळे

रस्ते-पुलांचा अनुशेष भरून काढल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी निर्णायक पाठपुरावा; डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोच्या काळात उपसा सिंचनाने पाणी उचलण्याचा प्रस्ताव —

कोपरगाव वृत्त वेध:
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील सात वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. रस्ते, पूल आणि विविध मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावत आता पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.


कालव्यात पाणी आले की पूर्व भागाकडेही ‘उपसा’!
पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे कालव्यातील ओव्हरफ्लोच्या काळात उपलब्ध होणारे पाणी उपसा सिंचनाद्वारे उचलण्याचा पर्याय पुढे आला आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पाणी उचलण्यासाठी आवश्यक नियोजन कशा पद्धतीने करता येईल, याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून जलसंपदा विभागाला सादर झाल्यानंतर मंजुरीसाठी पाठपुरावा अधिक वेगाने करण्यात येणार असल्याचे आ. काळे यांनी स्पष्ट केले.प्रस्ताव, सर्वेक्षण आणि अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंजुरीचा टप्पा किती लवकर पार पडतो, याकडे आता पूर्व भागाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या