सडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन बारहाते बिनविरोध

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार; नवनिर्वाचित उपसरपंचांची ग्वाही

वृत्तवेध ऑनलाईन | कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील सडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन अंकुश बारहाते यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान उपसरपंच सौ. अनिता संतोष बारहाते यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

लोकनियुक्त सरपंच सौ. आशाताई सूर्यभान बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत नितीन अंकुश बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच नितीन बारहाते यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मूलभूत सुविधा आणि विकास योजनांना प्राधान्य

गावातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे आणि शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे याला प्राधान्य राहील. ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून गावाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती

नवनिर्वाचित उपसरपंच नितीन बारहाते यांचे माजी आमदार अशोकराव काळे आणि आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


वृत्तवेध ऑनलाईन | स्थानिक बातम्या, जनतेचा आवाज!

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या