कोपरगाव | वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा जागर केला.
यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमान जागविणारे झंझावाती विचार होते. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. बाळासाहेबांचे विचार हीच आपली खरी ताकद आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडत सामान्य शिवसैनिकाला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या आक्रमक आणि स्पष्टवक्त्या भूमिकेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिशा दिली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.
या अभिवादन कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, शिवसेना शहरप्रमुख अक्षय जाधव, माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे, कुकूशेठ सहानी, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, दिलीप आरगडे, मकरंद जोशी, सोमनाथ शिंगाडे, विक्रांत झावरे, शेखर कोलते, राहुल देशपांडे, सुनील साळुंखे, नरेंद्र बैरागी, रवी खिल्लारे, अभिषेक आव्हाड, सतीश लोळगे, श्रीपाद भसाळे, विशाल झावरे, पांडुरंग देवरे, रवींद्र खिल्लारे, बबन जोगदंड, अशोक पवार, ललित ठोंबरे, अशोक अस्गे यांच्यासह शिवसैनिक आणि कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
