रक्तदानातून समाजसेवेचा संदेश; अण्णाभाऊंचे विचार नव्या पिढीला दिशा देणारे – आ. विवेक कोल्हे

कोपरगाव | वृत्तवेध
“जग बदल घालूनी घाव” असा संघर्षाचा संदेश देणारे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देत आहे. त्यांच्या विचारांचे जतन आणि समाजसेवेची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.


डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजघटकांच्या वेदनांना आवाज दिला. सामाजिक समता, बंधुता आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांच्या लेखणीतून समाजापर्यंत पोहोचला असून, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारे आहे.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत, राज्य सरकारने डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीसाठी ठोस पावले उचलल्याचेही त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे जगातील पहिले डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची उपस्थितांनी कृतज्ञतेने आठवण केली. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक कार्याचा गौरवही यावेळी करण्यात आला.


मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, भाजप तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे, बबलूशेठ वाणी, दिलीप दारुणकर, विजय आढाव, राजेंद्र बागुल, संजय उदावंत, विनोद राक्षे, संतोष शिंदे, विक्रमादित्य सातभाई, कैलास मंजूळ, संदीप देवकर, आकाश वाजे, दत्तात्रय पगारे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या