नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार : आमदार आशुतोष काळे

‘समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य मोबदला मिळवून देऊ’; झगडे फाटा-वडगावपान रस्त्यासाठी १७ कोटींच्या काँक्रीटीकरणाचा प्रारंभ

वृत्त वेध कोपरगाव :

नियोजित नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गासाठी जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्तांप्रमाणे योग्य आणि चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. जमिनींचे अधिग्रहण होईपर्यंत शेतकऱ्यांना हरकती नोंदविता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. संघटितपणे लढा देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोहेगाव येथे १७ कोटी रुपये निधीतून झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख तालुका हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा प्रारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

तीन वेळा दुरुस्ती करूनही रस्ता खराब; आता काँक्रीटीकरण

‘भूसंपादनापूर्वी हरकती नोंदवा; घाबरू नका’

नियोजित नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गामुळे चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, बहादरपूर आणि धोंडेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

जमिनींचे अधिग्रहण होईपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्यासाठी ठरावीक मुदत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, तोपर्यंत संघटितपणे पाठपुरावा करू. आपण शेतकऱ्यांसोबत आहोत,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

विहिरी, पाइपलाइनचाही योग्य मोबदला हवा

‘समृद्धी महामार्गाप्रमाणे एकजूट दाखवा’

समृद्धी महामार्गाच्या वेळी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलन केले आणि त्यातून चांगला मोबदला मिळवून देण्यात यश आले. त्याच धर्तीवर नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांनीही एकजूट दाखवावी, असे आवाहन आमदार काळे यांनी केले.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकट : १६५ कोटींसाठी निधीचे विविध पर्याय तपासणार

कार्यक्रमास मोठी उपस्थिती

कार्यक्रमास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या