श्री क्षेत्र लाखोंडा : परमहंस परशराम महाराजांच्या भक्तीचा अखंड दीप; जन्मोत्सवापासून मासिक पारायणापर्यंत अखंड भक्तिसेवा

अकोला जिल्ह्यातील लाखोंडा गावात आजही जिवंत आहे संतपरंपरेची भक्तीची परंपरा; जन्मोत्सव, पुण्यतिथी आणि मासिक पारायणाला भाविकांची मोठी उपस्थिती

कोपरगाव वृत्तवेध

लाखोंडा : काही गावांची ओळख त्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे निर्माण होते; तर काही गावांची ओळख एखाद्या संताच्या भक्तिपरंपरेशी जोडली जाते. अकोला जिल्ह्यातील श्री क्षेत्र लाखोंडा हे अशाच भक्तिभावाने न्हाऊन निघालेले स्थान. परमसंत श्री परमहंस परशराम महाराज यांच्या भक्तीची अखंड ज्योत येथे आजही तेवत आहे. महाराजांचा जन्मोत्सव, पुण्यतिथी, मासिक पारायण आणि विविध धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून गावाने त्यांची भक्तिपरंपरा जपली आहे.
विशेष म्हणजे महाराजांच्या उत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भंडारा आयोजित केला जातो. दहा ते पंधरा पोती गव्हाच्या पोळ्यांचा प्रसाद भाविकांना दिला जातो. गावातील लहान-मोठे नागरिक, भक्तगण आणि माहेरवाशीण लेकी उत्सवासाठी आवर्जून एकत्र येतात. त्यामुळे लाखोंडा येथे होणारे धार्मिक सोहळे केवळ उत्सव न राहता गावाच्या सामूहिक भक्तीचे प्रतीक ठरतात.


पिंपळोद येथे संजीवन समाधी
महाराजांच्या कार्याचा मोठा काळ श्रीक्षेत्र पिंपळोद येथे गेला. भक्तांच्या आग्रहातून येथे त्यांची संजीवन समाधी असल्याचे मानले जाते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.
पिंपळोद-येवदा मार्गावरील महाराजांनी निर्माण केलेल्या अमृतमय जलकुंडाजवळही भक्तांच्या पुढाकारातून मंदिर उभारण्यात आले आहे. विविध भक्तांच्या योगदानातून विकसित झालेली ही स्थळे आज महाराजांच्या स्मृती आणि भक्तिपरंपरेची केंद्रे म्हणून ओळखली जातात.


महाराजांचे स्मरण, गावाची एकजूट
लाखोंडा हे त्यामुळे केवळ एका धार्मिक स्थळाचे नाव नाही. श्री परमहंस परशराम महाराजांच्या स्मृतीभोवती उभी राहिलेली श्रद्धा, सेवा आणि सामूहिक सहभागाची परंपरा अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.
महाराजांच्या जन्मोत्सवापासून पुण्यतिथीपर्यंत आणि मासिक पारायणापासून भंडाऱ्यापर्यंत विविध उपक्रमांतून ही परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचत आहे. भक्तांसाठी लाखोंडा म्हणजे श्रद्धेचे स्थान, तर ग्रामस्थांसाठी महाराजांच्या स्मरणातून एकत्र येण्याचे केंद्र.
भक्तीची ज्योत अशीच अखंड तेवत राहो आणि संतपरंपरेचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो—हीच श्री परमहंस परशराम महाराजांच्या चरणी प्रार्थना.

खारपानपट्ट्यात गोड्या पाण्याची धार; महाराजांच्या लीलांची आजही साक्ष देणाऱ्या विहिरी


जय श्री परमहंस परशराम महाराज!
आपला स्नेहांकित सेवाधारी
जयंत सुरेशराव वानखडे
९७६३७२९१३१
अमरावती / खामगाव

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या