सात दिवसांचा अल्टिमेटम संपला; गगन हाडांची पोलीस अधीक्षकांकडे धाव!

कारवाईच्या आश्वासनानंतर शिवसेनेचे आंदोलन स्थगित

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहर व तालुक्यातील कथित अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत संपल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) अहिल्यानगर येथे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेतली. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पक्षाने प्रस्तावित आंदोलन स्थगित केले.

पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित केल्याचे हाडा यांनी सांगितले. दरम्यान, अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासन प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी गगन हाडा यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भावेश थोरात यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या