अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई कधी? गगन हाडांचा सवाल; २ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

सात दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट; आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध मटका-जुगारासह अन्य अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेला सात दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर शहरप्रमुख गगन हाडा यांनी सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) अहिल्यानगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेत निवेदन दिले. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रस्तावित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मात्र, कारवाई न झाल्यास २ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सात दिवसांची मुदत संपली, वरिष्ठांकडे धाव

२ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे

अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास २ नोव्हेंबरपासून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे. अवैध धंद्यांविरोधात जनजागृती करणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे, हा आंदोलनाचा उद्देश असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

आश्वासनानंतर आता कारवाईकडे लक्ष

पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई झाल्यास आंदोलनाचा प्रश्न निकाली निघू शकतो; अन्यथा २ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे.

यावेळी गगन हाडा यांनी पोलीस अधीक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भावेश थोरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या