कोपरगावात ५ नोव्हेंबरला ‘लोकसंवाद’; नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा!

आ. विवेक कोल्हे यांचा पुढाकार; दहा गणांतील नागरिकांना समस्या मांडण्याची संधी, २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज देण्याचे आवाहन

कोपरगाव | राजेंद्र सालकर

कोपरगाव : शासकीय कार्यालयांतील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि गावोगावच्या विकासकामांच्या मागण्यांना गती देण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव तालुक्यात ‘लोकसंवाद’ उपक्रमाचे आयोजन गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडता येणार असून, संबंधित विभागांकडून तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीची माहितीही मिळणार आहे.

आ. विवेक कोल्हे यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबाबत कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे, प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाहीसाठी प्रयत्न करणे आणि विकासकामांच्या मागण्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दहा गणांतील नागरिकांना संधी

२९ ऑक्टोबरपर्यंत गणप्रमुखांकडे अर्ज द्या

लोकसंवादात आपल्या समस्या मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ पूर्वी संबंधित गणप्रमुखांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जामध्ये समस्येचा सविस्तर तपशील नमूद करावा, जेणेकरून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करता येईल.

विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित

वृत्तवेध ऑनलाईन | कोपरगाव बातमी : राजेंद्र सालकर

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या