बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोप्रकरणी कोपरगावात संताप; शायना एनसी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध

शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन; पोलिसांनी कारवाई करण्याची गगन हाडा यांची मागणी

कोपरगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फाडल्याच्या कथित प्रकाराचे पडसाद कोपरगावात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कमानीसमोर आंदोलन करत शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शायना एनसी यांच्या फोटोला काळे फासून व जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात शहर प्रमुख गगन हाडा, तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे, उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख, संजय दंडवते, संपर्कप्रमुख मनोज कपोते, विधानसभा प्रमुख विवेक कुलकर्णी, युवासेना तालुका प्रमुख विजय गोर्डे, बाळासाहेब मापारी, सुनील माकोने, विठ्ठल निकम, काना हाडा, नंदू निकम, निखिल क्रँकाले, नानासाहेब निकम, हृषिकेश खैरनार, वरुण टाक, कुणाल चावरे, विनय टाक, मुन्ना मन्सुरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.


इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या