कोपरगावच्या मतदारांनो, तुमचे नाव यादीत आहे का? तब्बल ३७,६३१ नावे गायब!

SIR नंतर प्रारूप मतदार यादी जाहीर; मयत, स्थलांतरित, अनुपस्थित आणि दुबार नोंदींची नावे वगळली; पात्र मतदारांना ३० सप्टेंबरपर्यंत दावा-हरकतीची संधी

कोपरगाव वृत्तवेध :

विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात SIR प्रक्रियेनंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून तब्बल ३७ हजार ६३१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील प्रत्येक मतदारासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.

तुमचे नाव यादीत आहे का? हे आजच तपासा!
२.८७ लाखांवरून मतदारसंख्या थेट २.५० लाखांवर
SIRपूर्वी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २ लाख ८७ हजार ७०७ मतदार नोंदणीकृत होते. पुनरिक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत २ लाख ५० हजार ७६ मतदार कायम राहिले आहेत.
म्हणजेच तब्बल ३७ हजार ६३१ नावे वगळण्यात आली आहेत.


“नाव आहे की नाही, आजच तपासा!”
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हेमलता बडे आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी याबाबत माहिती दिली.
“प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून दावे व हरकती ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास नियमानुसार दावा दाखल करावा,” असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले.


४ नोव्हेंबरला अंतिम यादी
३० सप्टेंबरपर्यंत प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींचे निराकरण २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
एक काम आजच करा!
मतदार यादीत आपले नाव तपासा → नाव नसेल तर नमुना ६ → चूक असल्यास नमुना ८ → ३० सप्टेंबरपूर्वी दावा दाखल करा.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या