महालक्ष्मी ट्रेडर्सला मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला; तीन लाखांचा माल लंपास!

सिगारेटचे बॉक्स, रोकड अन् चिल्लर चोरीला; सीसीटीव्हीचा डीव्हीआर नेला, मात्र कारसह चोरटे दुसऱ्या कॅमेऱ्यात कैद

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर : शहरातील महालक्ष्मी ट्रेडर्स या होलसेल दुकानाला मध्यरात्री अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनजवळील कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून दुकानात प्रवेश केला.

डीव्हीआर नेला; पण चोरट्यांची कार सीसीटीव्हीत कैद!

दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच दुकानमालकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. कार आणि चोरट्यांच्या हालचालींच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

वृत्तवेध फार्मुला

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या