कान-नाक-घशाच्या आजारांकडे दुर्लक्ष नको! आ. आशुतोष काळे

कोपरगाव वृत्त वेध:

कान, नाक आणि घसा यांच्याशी संबंधित किरकोळ त्रासाकडेही दुर्लक्ष करू नका. त्रास वारंवार जाणवत असल्यास वेळीच तपासणी करून घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास गंभीर आरोग्य समस्या टाळता येतात, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.


कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि गर्जे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कान, नाक व घशाच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्मवीर शंकरराव काळे सहकार सभागृहात बुधवारी (दि. १९) सकाळी १० वाजता आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे कौतुकास्पद आहे. गरजू नागरिकांना तज्ज्ञ आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


मान्यवरांची उपस्थिती
यावेळी डॉ. अजय गर्जे, डॉ. वरद गर्जे, डॉ. नकुल गर्जे, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. दत्तात्रय कोळपे, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, प्रशांत घुले, विष्णुआबा शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदिप शिरसाठ, कारखाना आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश जैन, मुख्य लेखा अधिकारी वैभव काळे, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सूर्यकांत ताकवणे, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या