कासलीचा १३ मेगावॅट सौर प्रकल्प अंतिम टप्प्यात; दहा गावांच्या वीजप्रश्नाला उजेडाची आशा!

आ. विवेक कोल्हे यांचा महावितरणकडे पाठपुरावा; ४० एकरांवर उभारलेला प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

कोपरगाव तालुक्यातील कासली येथे ४० एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेला १३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. फिडरसंदर्भातील अडचणी दूर करून प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून, लवकरच लोकार्पण होण्याची अपेक्षा आहे.

सध्या सिंगल फेज आणि थ्री फेज वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने ओव्हरलोडिंग आणि कमी दाबाने वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही सुरू झाल्याचे सांगण्यात आले. कासलीचा सौर प्रकल्प आणि फिडरवरील भार कमी करण्याची कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकरी व अन्य वीजग्राहकांना कितपत दिलासा मिळतो, हे प्रत्यक्ष कार्यान्वयनानंतर स्पष्ट होणार आहे.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या