दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोपरगावातून पाठिंबा; तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा मोर्चा

कोपरगाव वृत्त वेध :दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कोपरगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.


देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, अनियमितता आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होऊ नये, विद्यार्थ्यांच्या शिक्षण व भवितव्याशी खेळ थांबवावा आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले.


मोर्चात जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले, तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, शहराध्यक्ष स्वप्नील पवार, तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे, तालुका युवक अध्यक्ष निखिल थोरात, शहर कार्याध्यक्ष रिंकू मगर, सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुराज काळे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत सदाफळ, युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन पाचोरे, युवक तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गवळी, प्रशांत मेहेरखांब, सूरज औताडे, किरण भालेराव, किशोर जाधव, सोमनाथ घारे, नंदकिशोर जाधव, ओंकार वढणे, माजिद पठाण, ज्ञानदेव जाधव, तेजस दिघे, ओम सरवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आपल्या परिसरातील बातमी असेल तर ही पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या