कोपरगावात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलची भव्य आषाढी दिंडी; विठ्ठलभक्तीसह स्वच्छता, पर्यावरण आणि भेसळमुक्त भारताचा संदेश

कोपरगाव | वृत्तवेध
वारकरी वेशभूषा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि मुखी अखंड “विठ्ठल… विठ्ठल…”चा गजर… अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी कोपरगाव शहरातून भव्य आषाढी दिंडी काढत वारकरी परंपरेचा जागर केला. या दिंडीतून विठ्ठलभक्तीबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि भेसळमुक्त भारताचा प्रभावी सामाजिक संदेशही देण्यात आला.


कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वारकरी वेशात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या दिंडीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.


विठ्ठल-रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांची दिंडी सराफ बाजारातील पवार सरकार संस्थानच्या सोमेश्वर महादेव मंदिरात पोहोचली. येथे बालवारकऱ्यांनी फुगड्या, टाळ-भजन आणि हरिनामाच्या गजरातून भक्तिरसाची अनुभूती दिली. मंदिर परिसरात पालखीचे पूजन करून दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.


मराठा पंच हनुमान व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे, कारभारी नजन, व्यापारी राजेंद्र शिंगी, प्रफुल्ल पांडे, सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


या उपक्रमात संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भक्ती, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या आषाढी दिंडीने कोपरगावकरांच्या मनावर विशेष छाप उमटवली.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या