झाड कोसळताच नगरपरिषदेची धाव; मदतकार्य सुरू असतानाच राजकारणाचा आरोप

कोपरगाव | प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील एका भागात मोठे झाड अचानक कोसळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पडलेले झाड हटविण्यासाठी नगरपरिषदेचे अत्याधुनिक ‘गोरखा’ वाहन घटनास्थळी पोहोचविण्यात आले. झाडाचा आकार मोठा असल्याने सुरक्षितरीत्या हटविण्यासाठी क्रेनही मागविण्यात आली.


स्थानिक दुकानदारांनी नगरपरिषद प्रशासन व नगराध्यक्षांना घटनेची माहिती दिल्यानंतर कोणताही विलंब न करता मदतकार्य सुरू करण्यात आले. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असतानाच काही राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित व्यक्तींनी या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात सुरू झाली. प्रत्यक्ष परिस्थितीची पूर्ण माहिती न घेता काहींनी सोशल मीडियावर तसेच घटनास्थळी प्रशासनावर टीका केल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.


दरम्यान, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त होत असून प्रत्येक घटनेला राजकीय रंग देण्याची प्रवृत्ती टाळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे अनेकांनी स्वागत करत अशा प्रसंगी सकारात्मक सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles