सावळी विहीर येथील साई जतीन दूध केंद्रावर FDA ची कारवाई; परवाना निलंबित, तरीही दूध संकलन सुरू!

शिर्डी: राहाता तालुक्यातील सावळी विहीर येथील साई जतीन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. मंचर येथील पराग डेअरीकडे पाठवण्यात आलेल्या २२ दूध टँकरमधील नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्रुटी आढळल्याने संबंधित दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रावर दररोज सुमारे ३० हजार लिटर दूध संकलित केले जाते. राहाता तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून तसेच इतर जिल्ह्यांमधूनही येथे दूध संकलन होत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाने दूध संकलन तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले असतानाही केंद्रावर दूध संकलन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे FDA च्या आदेशांचे पालन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून, तपासात नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दूध संकलन सुरू असल्याच्या आरोपांबाबत संबंधित साई जतीन दूध संकलन केंद्राची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles