रामा-१६०च्या दुरवस्थेविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा पायी एल्गार; २५ ऑगस्टपासून दररोज १० किमी चालत अहिल्यानगरकडे प्रस्थान

कोपरगाव वृत्तवेध:

कोपरगाव-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०ची दुरवस्था आता केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर विषय बनला आहे. खड्डे, उखडलेला रस्ता आणि रखडलेली कामे यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक झाला असून, रस्त्याच्या प्रश्नावर शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


रामा-१६०चा मोठा भाग सात विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीतून जातो. या पट्ट्यात १० आमदार आणि २ खासदारांचे लोकप्रतिनिधित्व असतानाही महामार्गाच्या दुरवस्थेवर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि रखडलेल्या कामांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.


रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, काम पूर्ण होण्यास होणारा विलंब तसेच संबंधित कंत्राटदार कंपन्यांवर करण्यात आलेली किंवा प्रस्तावित कारवाई याबाबत प्रशासनाने पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.


काळे म्हणाले, “रामा-१६०ची अवस्था पाहता नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता मजबूत, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. केवळ आरोप-प्रत्यारोप न करता प्रत्यक्ष कामाला गती देणे गरजेचे आहे.”


“हा कोणत्याही पक्षाविरोधातील लढा नसून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठीचा आवाज आहे. माझ्या पायी प्रवासाची दखल घेऊन प्रशासनाने रामा-१६०च्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा,” असेही काळे यांनी स्पष्ट केले.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या