कोपरगाव : शहरातील विविध नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी राज्य शासनाने ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ७८ लाख रुपये, तर मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा-रस्ता अनुदान योजनेंतर्गत १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये विरंगुळा केंद्रे, रस्ता विकास आणि धार्मिक स्थळांवरील सभामंडपांची कामे करण्यात येणार आहेत.
कोणत्या कामांसाठी किती निधी?
जुने कब्रस्तान ते लाहोटी महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. अंबिका नगर येथील साईधाम, हनुमान नगरातील माऊली मंगल कार्यालयाजवळील इंगळे नगर, साई सिटी येथील रचना नक्षत्रसमोर येवला रोड आणि सह्याद्री कॉलनी येथे नगरपरिषदेची विरंगुळा केंद्रे उभारण्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच गणपती मंदिर, न्याती मंदिर आणि बाजारतळ येथील मेसाई माता मंदिर येथे सभामंडप उभारण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
या विकासकामांमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह रहिवाशांसाठी विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. रस्ते विकासामुळे दळणवळणाची सुविधा सुधारण्यास मदत होणार असून, मंदिरांमध्ये सभामंडप उभारल्याने भाविक व नागरिकांना सुविधा मिळणार आहेत.
या निधी मंजुरीबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
वृत्तवेध फार्मुला
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
