शिर्डी वृत्तवेध:
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे भावपूर्ण दर्शन घेतले. साईचरणी नतमस्तक होत त्यांनी समाधी मंदिरात प्रार्थना केली आणि साईबाबांच्या दर्शनाचा आध्यात्मिक अनुभव घेतला. त्यांच्या शिर्डी भेटीमुळे भाविकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी मीनाक्षी शेषाद्री यांचा शाल व श्री साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत साईबाबांचा आशीर्वाद लाभावा, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
देश-विदेशातून लाखो साईभक्त श्रद्धेने शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत असतात. राजकीय, सामाजिक, क्रीडा, उद्योग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरही वेळोवेळी साईचरणी नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त करतात. त्याच परंपरेत अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनीही साईबाबांचे दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला.
त्यांच्या शिर्डी भेटीदरम्यान काही भाविकांनी त्यांचे स्वागत केले, तर दर्शनानंतर त्यांनी शांतपणे मंदिर परिसरातून प्रस्थान केले. त्यांच्या भेटीची चर्चा दिवसभर साईनगरीत सुरू होती.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
