राष्ट्रीय सॉफ्टबॉल निवड चाचण्यांना कोपरगावात प्रारंभ; चीन-तैवान आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड संजीवनीतून

वृत्तवेध | कोपरगाव
कोपरगावातील संजीवनी विद्यापीठाने देशाच्या क्रीडा नकाशावर आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. अंडर-१५ गर्ल्स सॉफ्टबॉल एशिया कप २०२६ (चीन) आणि एशियन युनिव्हर्सिटीज वुमेन्स सॉफ्टबॉल कप २०२६ (तैवान) या प्रतिष्ठेच्या स्पर्धांसाठी भारतीय संघाच्या राष्ट्रीय निवड चाचण्यांचे यजमानपद संजीवनीला मिळाले असून, देशभरातील उद्याचे सॉफ्टबॉल स्टार्स घडविण्याची ऐतिहासिक संधी कोपरगावाला मिळाली आहे.


सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रवीण अनावकर यांनी सांगितले की, संजीवनी विद्यापीठातील अत्याधुनिक क्रीडा सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आणि शिस्तबद्ध आयोजनामुळेच राष्ट्रीय निवड चाचण्यांसाठी संजीवनीची निवड करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासूनची ही इच्छा यंदा पूर्ण झाली असून, ही संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


राष्ट्रीय निवड चाचण्यांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव प्रदीप तळवेलकर, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव ओमप्रकाश शर्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


डीन ऑफ स्पोर्ट्स विरुपक्ष रेड्डी यांनी प्रास्ताविकातून संजीवनीच्या क्रीडा विकासाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सॉफ्टबॉलपटू व प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


डॉ. अनावकर यांनी स्पष्ट केले की, ऑक्टोबरमध्ये चीन आणि तैवानमध्ये होणाऱ्या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचा अंतिम संघ याच निवड चाचण्यांमधून निश्चित होणार आहे. त्यामुळे या मैदानावरून निवड होणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही कारकीर्द घडविणारी सुवर्णसंधी ठरणार आहे.


प्रदीप तळवेलकर यांनी खेळाडूंना सातत्य, संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व पटवून देत “तुम्हे लंबा चलना है” असा प्रेरणादायी संदेश दिला. १९६७ मध्ये पुण्यापुरता मर्यादित असलेला सॉफ्टबॉलचा खेळ आज महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विद्यापीठांमध्ये पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंना अधिक शासकीय पाठबळ मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाला हेड ऑफ जनरल अॅडमिनिस्ट्रेशन तथा जिमखाना इन्चार्ज नानासाहेब लोंढे, प्राध्यापक, अधिकारी आणि देशभरातून आलेले खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वस्तिका जगताप आणि धनश्री देवकर यांनी केल.

आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या