कोपरगावात एलसीबीचा मोठा धडाका; ₹१.४० लाखांचा गुटखा जप्त, ११ आरोपींवर ५ गुन्हे

कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कोपरगाव शहर व तालुक्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या धडक मोहिमेत ११ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून ₹२,१४,७७२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका कारवाईतच ₹१.४० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त झाल्याने अवैध गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून कारवाईचे नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, विजय ठोंबरे, अभिजीत अरकल, अशोक लिपणे, रणजीत जाधव आणि अमृत आढाव यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे १ ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर धडकविशेष पथकाने १ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे शहर आणि तालुक्यातील अवैध गुटखा विक्री तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले


याशिवाय भोजडे परिसरात ₹३६,२४० किमतीचा गुटखा जप्त करून अभिजीत रविंद्र ठाकरे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. कोळपेवाडी येथे ₹१४,१३२ किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून अरिफ रज्जाक पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा साथीदार अर्जुन सोनी हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


जुगार अड्ड्यांवरही कारवाई
शिंगणापूर व लक्ष्मीनगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात अनेक आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून एका प्रकरणातील आरोपी फरार आहे.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या