‘कर्मालाच ईश्वरसेवा मानले; कष्टातही विठ्ठलभक्ती जपली!’-अशोक काळे

कोपरगाव वृत्तवेध:

शेतात राबताना मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि मनात अखंड ईश्वरभक्ती ठेवत संत शिरोमणी सावता महाराजांनी कष्ट, निष्ठा आणि भक्तीचा अनोखा संगम घडविला. कष्टाला भक्तीची जोड देत त्यांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे रूप दिले. त्यांचा हा कर्मयोग आणि समतेचा संदेश आजच्या आधुनिक युगातही समाजाला दिशा देणारा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले.


संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात काळे यांनी संत सावता महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.


‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ या अभंगातून त्यांनी सामान्य माणसाच्या रोजच्या कष्टांनाही भक्तीचे रूप दिले. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रमाला प्रतिष्ठा आहे, हा संदेश त्यांनी समाजाला दिला.


समाजबांधवांची उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, रवीकाका बोरावके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक विरेन बोरावके, कांचनताई बोरावके, अरुणाताई ताम्हाणे, तुषार ससाणे, प्रदीप नवले, प्रकाश रासकर, बापूसाहेब इनामके, विशाल राऊत, सतीश भुजबळ, राजेंद्र खैरनार, वैभव गिरमे, सुमित भोंगळे, विजय वढणे, सचिन ससाणे, प्रशांत मोरे, शैलेश गाडेकर, नंदकुमार शिवरकर, रविंद्र चौधरी, बाबासाहेब घोरपडे, विलास ताम्हाणे, महेंद्र बोरावके, सुमित जगझाप, नितीन भुजबळ, मंगेश झगडे, राहुल बनकर, वाल्मिक बारस्कर, ओंकार वढणे, शाम गिरमे, चंद्रकांत शिवरकर, गिरीश हिवाळे, शेखर बोरावके, अक्षय गिरमे, नगरसेवक जनार्दन कदम, विजय त्रिभुवन, सोमनाथ आढाव, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी, दिनकर खरे, गणेश बोरुडे, मुकुंद भूतडा, सुनील फंड, प्रशांत वाबळे, धनराज जाधव, मयूर शिंदे, संजय दुशिंग, प्रविण कुऱ्हाडे, गणेश गोसावी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातमी असेल तर ही पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या