कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे; संचालक मंडळाची सर्वानुमते निवड

कोपरगाव वृत्तवेध:

तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी आमदार अशोक काळे आणि चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी कुदळे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


उपाध्यक्षपदासाठी दिनार कुदळे यांच्या नावाची सूचना संचालक सुनील मांजरे यांनी मांडली. त्यास संचालक राजेंद्र घुमरे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे यांनी काम पाहिले.


यावेळी मावळते उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी कुदळे यांना शुभेच्छा दिल्या. संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, ॲड. राहुल रोहमारे, अनिल कदम, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, अशोकराव मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, इंदूबाई शिंदे, वत्सलाबाई जाधव, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने यांच्यासह कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदी उपस्थित होते.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या