अमित शाह-कोल्हे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; सहकार, ग्रामीण विकासावर दिल्लीत खलबते

नवी दिल्ली | कोपरगाव वृत्तवेध
देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची विधानपरिषद आमदार विवेक कोल्हे यांनी कुटुंबासह नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि ईशान कोल्हे यावेळी उपस्थित होते.

या भेटीत सहकार क्षेत्राचे आधुनिकीकरण, शेतकरी हित, ग्रामीण विकास, कृषीपूरक उद्योग, युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अधिक सक्षम करण्यासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.


विशेष म्हणजे, मागील वर्षी कोपरगावातील कोल्हे साखर कारखान्यात देशातील पहिल्या सहकारी सीबीजी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी अमित शाह आले होते. त्यानंतर विवेक कोल्हे यांच्या सहकार क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत शाह यांनी अनेकदा त्यांच्याशी संवाद साधला आहे.


बैठकीत केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या विविध योजनांचा ग्रामीण भागाला अधिक लाभ मिळावा, सहकारी संस्थांचे आधुनिकीकरण, शेतकरी-केंद्रित विकास, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.


आमदार विवेक कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामे, सहकार क्षेत्रातील सुरू असलेले उपक्रम आणि भविष्यातील नियोजनाची माहिती अमित शाह यांना दिली. नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


यावेळी अमित शाह यांनी कोल्हे परिवाराच्या सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल घेत शुभेच्छा दिल्या. देशाच्या विकासात सहकार चळवळीची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.


वृत्तवेध विश्लेषण
ही भेट केवळ औपचारिक सदिच्छा भेट म्हणून मर्यादित न राहता, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आणि भविष्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विधानपरिषदेत विवेक कोल्हे यांची एंट्री आणि त्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली चर्चा यामुळे कोपरगावसह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles