इथेनॉलचे मिश्रण सरकारचे धोरण असेल, तर स्वस्त इंधन देणे ही सरकारची जबाबदारी!” पेट्रोल-डिझेल स्वस्त करा!- उद्धव ठाकरे शिवसेना 

कोपरगाव वृत्त वेध: 

पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे धोरण सरकारने थांबवावे. हे मिश्रण कायम ठेवायचे असेल तर सर्वसामान्य वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत कोपरगाव तहसीलदारांना निवेदन‌ जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत  देण्यात आले.

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याने इथेनॉल धोरण ठरविताना या घटकांच्या हिताचा समतोल साधावा. पेट्रोल-डिझेलचे दर, इथेनॉलचे दर आणि साखर उद्योगाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित

यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांची प्रमुख उपस्थिती होती.निवेदनावर तालुकाप्रमुख श्रीरंग दिनकरराव चांदगुडे, शहरप्रमुख गगनभैय्या हाडा, उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, तालुका संघटक बाळासाहेब जाधव, शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्माभाऊ जावळे, विधानसभा प्रमुख विवेक कुलकर्णी, युवा सेना प्रमुख विजय गोर्डे, माजी तालुकाप्रमुख गंगाधर राहाणे, भावेश थोरात यांच्यासह विठ्ठलतात्या निकम, विठ्ठल वाबळे, बाळासाहेब मापारी, प्रदोष शिंदे, शुभम होन, मनोहर पवार, चंद्रकांत सोळसे, महेश होन, अमोल गायकवाड, विकास गाडे, बाळासाहेब मायमोडे, भाऊसाहेब खिलारी, संदीप शिंदे, मयूर तपकिरे, साईनाथ दुशिंग, नंदू निकम, सुनील माकुणे, काना हाडा, पियुष सैंदाणे, वैभव शेलार, विनय टाक, दिनेश मरसाळे आदी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक उपस्थित होते.


इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या