दिवाळीआधीच ‘गोड बातमी’; नगरपालिका कर्मचाऱ्यांना संघर्षाविना मिळाला हक्काचा पैसा;

पगार, ॲडव्हान्स अन् प्रलंबित पेन्शन वेळेत; कर्मचारी वर्गात समाधान

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन राजेंद्र सालकर :

पगारासाठी आंदोलन, निवेदन किंवा उपोषण करण्याची वेळ न येता यंदा कोपरगाव नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या हक्काची रक्कम दिवाळीपूर्वीच हातात पडली आहे. सफाई कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन व दिवाळी ॲडव्हान्स, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पगार तसेच काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित पेन्शन व अन्य देणी वेळेत अदा करण्यात आल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरली आहे.यापूर्वी वेतन व अन्य देणी मिळवण्यासाठी सफाई कामगारांसह काही कर्मचाऱ्यांना निवेदने, आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची परिस्थिती होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही आंदोलनाशिवाय दिवाळीपूर्वीच देणी अदा झाल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

दिवाळीपूर्वी हक्काची रक्कम खात्यावर

आंदोलनाची गरज न पडणे, हीच सकारात्मक बाब

🔶 चौकट | हक्काच्या पैशांसाठी संघर्ष नको!

वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या