समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला ? कोपरगाव पोलिसांची कारवाई; चौघे ताब्यात

पुलाखाली संशयास्पद पिकअपची झडती; तलवार, कत्ती, खिळे ठोकलेल्या फळ्या आणि बनावट नोटांची बंडले जप्त, एक जण पसार

कोपरगाव वृत्तवेध: राजेंद्र सालकर
समृद्धी महामार्गावर वाहनांना लक्ष्य करून लूट करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असलेल्या टोळीचा डाव कोपरगाव शहर पोलिसांनी उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर-मनमाड मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची झडती घेतली असता तलवार, धारदार कत्ती, वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी खिळे ठोकलेल्या लाकडी फळ्या आणि बनावट नोटांची बंडले आढळून आली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला.


ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस कर्मचारी प्रवीण वसंत रनधीर यांच्यासह होमगार्ड पथक समृद्धी महामार्ग परिसरात पेट्रोलिंग करीत असताना INTRA V10 PICKUP LX (एमएच ०५ एफजे १७९८) हे वाहन पुलाखाली संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले.


पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता लोखंडी तलवार, धारदार कत्ती, तीन खिळे ठोकलेल्या लाकडी फळ्या, मोबाईल फोन आणि ५०० रुपयांच्या नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटांची बंडले आढळली. या साहित्याचा वापर वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना लुटण्यासाठी केला जाणार होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


तपासातून उलगडणार अनेक प्रश्न
महामार्गावर लुटीचा डाव नेमका कुणाला लक्ष्य करून आखण्यात आला होता? या टोळीचा यापूर्वीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का? पसार झालेला ‘बबलू’ नेमका कोण? या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का? जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा प्रत्यक्ष वापर यापूर्वीच्या गुन्ह्यांत झाला आहे का?
या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणार आहेत.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या