उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी कोपरगावचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना!

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवसैनिकांचा उत्साह; शहर व तालुक्यातील पदाधिकारी, युवासैनिकांचा मेळाव्यात सहभाग

वृत्तवेध ऑनलाईन | कोपरगाव :

शिवसेनेची परंपरा, भगव्याचा अभिमान आणि पक्षनिष्ठेची ताकद दाखविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याकरिता कोपरगाव शहर व तालुक्यातील शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या वेळी उपजिल्हाप्रमुख असलम शेख, संजय दंडवते, शहरप्रमुख गगन हाडा, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्मा जावळे, युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे, विधानसभा प्रमुख महेश कुलकर्णी, मुन्ना मंसूरी, भावेश थोरात, विकास गाडे, नंदू निकम, निखिल क्रंकाले, आबासाहेब पवार, पियूष सैदाने, राहुल हाडा, विनय टाक, ओम पवार, शांतनु चावरे, वरुण टाक, याकूब शेख आणि कुणाल चावरे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत.

कोपरगावच्या शिवसैनिकांची उपस्थिती


ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या