संजीवनीचा जागतिक व्यासपीठावर ठसा: तैवान, जर्मनी आणि जपानमधील नामांकित विद्यापीठांमध्ये संधी;

कोपरगाव | वृत्तवेध प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

संजीवनी फार्मसी महाविद्यालय आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांची तैवान, जर्मनी आणि जपानमधील नामांकित विद्यापीठांमध्ये तीन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली असून, एका विद्यार्थिनीची जर्मनीमध्ये एमएस (उच्च शिक्षण) साठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांकडून शिष्यवृत्तीही मिळाली आहे.


यंदा सई प्रकाश रासकर हिची तैवानमधील आय-शौ युनिव्हर्सिटी, ईश्वरी भाऊसाहेब अनुसे व कल्याणी जयवंत घोगळ यांची चांग गुंग युनिव्हर्सिटी, गायत्री भाऊसाहेब शिंदे हिची प्रॉव्हिडन्स युनिव्हर्सिटी, रोहित जयवंत घोगळ याची जर्मनीतील बर्लिन स्कूल ऑफ बिझनेस अँड इनोव्हेशन, तर प्रथम चंद्रशेखर गाडे याची टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. तसेच धनश्री प्रणील चौधरी हिची जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ सारलँड येथे एमएस शिक्षणासाठी निवड झाली आहे.


संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला.


इंटर्नशिपसाठी निवड झालेली कल्याणी घोगळ म्हणाली, “परदेशातील नामांकित विद्यापीठात इंटर्नशिपची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. चांग गुंग युनिव्हर्सिटीमध्ये निवड होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे आणि संस्थेच्या पाठबळामुळे शक्य झाले.”


या सत्कार सोहळ्यास डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डॉ. विपुल पटेल, डॉ. आर. एस. शेंडगे, डॉ. एम. बी. गवळी, डॉ. एम. ए. जावळे, प्रा. एन. वाय. सिद्दीकी, डॉ. प्रेरणा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


🔶 वृत्तवेध फोकस
ग्रामीण कॅम्पसमधून थेट जागतिक विद्यापीठांपर्यंत…!
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाची दारे खुली केली आहेत. सात विद्यार्थ्यांची परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड आणि एका विद्यार्थिनीची जर्मनीत उच्च शिक्षणासाठी झालेली निवड ही केवळ संस्थेची उपलब्धी नसून ग्रामीण भारताच्या शैक्षणिक क्षमतेचे जागतिक स्तरावर झालेले प्रभावी प्रतिनिधित्व आहे.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या