गोदातीर दुमदुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष!; गंगा गोदावरी महाआरतीने कोपरगाव भक्तिरसात न्हाऊन निघाले

कोपरगाव वृत्तवेध:

गोदावरीच्या पवित्र तीरावर भक्तीचा जागर, मुखी ‘हर हर महादेव’चा जयघोष आणि संत-महंतांच्या सान्निध्यात झालेली गोदामाईची महाआरती… अशा भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या लहान पूल परिसरात ‘गंगा गोदावरी महाआरती’चा सोहळा दिमाखात पार पडला. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त आयोजित या महाआरतीला शिवभक्तांसह नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि आमदार युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या महाआरतीचे आयोजन केले जाते. यंदाही गोदातीरावर श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.


यावेळी कोपरगाव शहरासह संपूर्ण परिसरातील नागरिकांना सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान आणि सर्वांगीण कल्याण लाभावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.


श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभी गोदामाईच्या साक्षीने झालेल्या या महाआरतीने कोपरगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला विशेष उंची मिळाली.


मान्यवरांची उपस्थिती
यावेळी आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले.


महाआरतीस शिवभक्त नागरिक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवासेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


युवासेवकांचे विशेष योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या महाआरतीने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.

आपल्या परिसरातील बातमी असेल तर ही पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या