मध्यरात्री संशयास्पद फिरणारा इसम निघाला ९.८० लाखांच्या दरोड्यातील फरार आरोपी; कोपरगाव तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कोपरगाव वृत्तवेध:

माहेगाव देशमुख येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या इसमाला कोपरगाव तालुका पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. कार्तिक गुलाब निकम (रा. माहेगाव देशमुख) असे त्याचे नाव असून, तपासात तो श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ९ लाख ८० हजार रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.


या दरोड्यात आरोपींनी महिलेच्या घरात प्रवेश करून कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ९ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. या गुन्ह्यातील निकमच्या साथीदारांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र, निकम पोलिसांना गुंगारा देत फरार होता.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रशिद शेख, प्रकाश नवाळी, सागर शेवाळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अनिल फाळके आणि होमगार्ड अमोल तासकर यांनी सहभाग घेतला.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या