ठाकरे हे नाव नाही, जनतेच्या लढ्याची ताकद!; उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसोबत सामाजिक उपक्रम

कोपरगाव वृत्तवेध:

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने लायन्स मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन देत सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत शिवसैनिकांनी समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.


यावेळी विद्यार्थ्यांना गोडधोड भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरी वाढदिवसाची भेट असल्याची भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.


मुंबईत २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला आणि २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


“निरागस विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मनाला समाधान मिळते. या चिमुकल्यांचे आशीर्वाद उद्धव साहेबांना लाभावेत, या भावनेतून हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला,” अशी भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


या उपक्रमाला तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, शहरप्रमुख गगन हाडा, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, विधानसभा संघटक बाळासाहेब जाधव, विधानसभा समन्वयक मुन्नाभाई मन्सुरी, मनोज कपोते, विवेक कुलकर्णी, भावेश थोरात, बाळासाहेब मापारी, विठ्ठल निकम, नंदू निकम, संजय गुंजाळ, करणा जावळे, युवा सेना तालुकाप्रमुख विजय गोरडे, रवी देवकर, काना हाडा, वैभव शेलार, पियुष सैंदाणे, समीर पटवेकर, निखिल कंकाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या